कोणतेही भय न बाळगता किंवा कोणत्याही पक्षःपाताशिवाय कायदयाचे राज्य चालविण्यासाठी, या देशाच्या कायद्यांची निःपक्षपणे अंमलबजावणी करण्यासाठी अमरावती ग्रामीण. पोलीस सदैव कटिबद्ध राहतील. तसेच समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि विकासासाठी अनुकूल, भयमुक्त वातावरण निर्माण करण्याकरीता प्रयत्नांची पराकाष्ठा करतील.
कायदा व सुव्यवस्था राखणे, गुन्हयाचा प्रतिबंध व तपास करणे, संघटीत गुन्हे/असामाजिक तत्वे आणि दहशतवादाविरूध्द कडक कारवाई करणे तसेच जातीय सलोखा राखणे इत्यादी कामासाठी अमरावती ग्रामीण. पोलीस सदैव कटिबध्द राहतील.
श्री. विशाल आनंद, भा.पो.से.,
पोलीस अधीक्षक, अमरावती ग्रामीण..